अतिवृष्टीमुळे वालधूनी नदीच्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यामुळे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करा – मनसे
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
मागील काही दिवसात सातत्याने झालेल्या आतीवृष्टीमुळे उल्हासनगर – 1 मधील बाळकृष्ण नगर,महात्मा गांधी नगर,राजीव गांधी नगर,विदर्भ वाडी उल्हासनगर – 3 मधील सम्राट अशोकनगर,वोडोलगांव,अयोध्यानगर,संजयगांधी नगर,रेणुका सोसायटी,आशीर्वाद सोसायटी, मीनाताई ठाकरे नगर तसेच उल्हासनगर शहरातील वालधूनी नदी काठी असलेल्या इतर विभागात वालधूनी नदीच्या पुराचे पाणी नागरिकांच्या घरात शिरल्यामुळे नागरिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून या नागरिकांना शासकीय मदत देण्यात यावी अशी मागणी मनसेचे माजी शहर अध्यक्ष बंडू देशमुख व जिल्हा सचिव संजय घुगे यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.प्रशासनाच्या वतीने हे पंचनामे करण्यासाठी दिरंगाई होत असल्याने मनसेच्या वतीने आंदोलनाचा ईशारा ही देण्यात आला आहे.यावेळी जिल्हा सचिव संजय घुगे, मा.शहर अध्यक्ष बंडू देशमुख,शालिग्राम सोनवणे,सचिन बेंडके,मुकेश सेठपलांनी,सुभाष हटकर,शैलेश पांडव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.