उल्हासनगरात वर्षा डान्सबार चालकाची गुंडगिरी ग्राहकावर जीवघेणी हल्ला.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर शहर हे व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते, पण या ठिकाणी वाढते डान्सबार लक्षात घेता डान्सबारचे उल्हासनगर शहर असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. काल उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन मधील १७ सेक्शन परिसरात मध्यवर्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या वर्षा डान्सबार मध्ये मोठी दुर्घटना टळली.वर्षा डान्सबार चालकाचे मालक आणि तिथे असलेल्या बाऊंसर,वेटर यांनी एका किरकोळ वादातून अली शेख नामक इसमास व त्याच्या ४ साथीदारास जबर मारहाण केली.मारहाणीमध्ये अली शेख याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असुन त्याचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला.या अगोदर देखील धुरु डान्सबार मध्ये एकाची हत्या करण्यात आली होती. शहरातील एकट्या श्रीराम चौकात जवळपास पन्नास- पन्नास मीटरच्या अंतरावर १२ ते १५ डान्स बार आहेत,त्या मध्ये मधुर,WWF,मस्तानी,गोल्डन गेट,९०,हंड्रेड Days, नाईंटी,किरण,ॲप्पल,आचल,राखी,पैराडाइज, टोपास या डान्सबार मध्ये देखील ग्राहकांवर असेच हल्ले होत राहतात.युवकांना बरबाद करणाऱ्या उल्हासनगर मधील डान्सबार बंद कधी होणार असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. काल झालेल्या प्रकरणात अली शेख याला मध्यवर्ती रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असून वर्षा डान्सबार चालकावर व तिथे उपस्थित असलेल्या बाऊन्सर,वेटर यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असे अली शेख यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले व या संपूर्ण प्रकरणाचा तपास मध्यवर्ती पोलिस स्टेशन करीत आहे.