उल्हासनगर मध्ये पुरामुळे नुकसान झालेल्या पुरग्रस्तांचे पंचनामे करा.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर येथिल वालधुनी नदीला आलेल्या पुरामुळे हजारो नागरिकांचे नुकसान झाले आहे . तेव्हा शासनाने ताबडतोब पुरग्रस्तांचे पंचनामे करुन त्यांना तात्काळ मदत करण्यात यावी अशी मागणी पॅनल १२ च्या माजी नगरसेविका सौ . सविती तोरणे – रगडे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .
उल्हासनगर शहरातुन वाहणाऱ्या वालधुनी नदीला गेल्या १९ तारखेला पुर आला होता. त्या पुराचे पाणी सम्राट अशोक नगर , आशिर्वाद सोसायटी , रेणुका सोसायटी , वडोलगाव , संजय गांधी नगर , अयोद्या नगर येथिल नागरिकांच्या घरात शिरल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . दरम्यान पुरग्रस्तांची पाहणी महापालिका व तहसिलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यानी केली होती . परंतु अद्याप पर्यंत कोणताही पंचनामा तहसिलदार कार्यालया मार्फत झालेला नाही . त्यामुळे तहसिलदार कार्यालया कडुन ज्या वरील नगरामध्ये पुराचे पाणी शिरुन नागरिकांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करुन ताबडतोब मदत देण्यात यावी , अशी मागणी पॅनल १२ च्या माजी नगरसेविका सौ . सविता तोरणे – रगडे यांनी उल्हासनगर तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे .दरम्यान याच मागणीचा विचार करुन दोन ते तीन दिवसात पुरग्रस्तांचे पंचनामे करण्यात येतील असे आश्वासन उल्हासनगर तहसिलदारानी दिले असल्याची माहीती सम्राट अशोक नगर येथील समाजसेवक आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवाजी रगडे यांनी दिली आहे .