कल्याण पूर्वेतील कमलादेवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विधानसभा व विधानपरिषदेच्या सभागृहाचे कामकाज प्रत्यक्ष पाहण्याची नामी संधी विद्यार्थ्यांना सन्मा. आमदार श्री. गणपत शेठ गायकवाड यांनी उपलब्ध करून दिली.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
कल्याण पूर्वेतील कमलादेवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना विधानसभा व विधानपरिषदेच्या सभागृहाचे कामकाज प्रत्यक्ष पाहण्याची नामी संधी विद्यार्थ्यांना सन्मा. आमदार श्री. गणपत शेठ गायकवाड यांनी उपलब्ध करून दिली.
विद्यार्थ्यांना नेहमीच नवनवीन अभ्यासाची उत्सुकता असते. पुस्तकांच्या माध्यमातून, वर्तमानपत्रे, टीव्ही चॅनेल यामधून दाखवले जाणारे अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्ष पाहायला मिळणे हा महाविद्यालयीन जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरतो.
यावेळी आमदार साहेबांनी विद्यार्थ्यांना दोन्ही सभागृहांचा परिसर दाखवत सभागृहातील बैठकव्यवस्था दाखवली.तसेच विधानभवनातून घरी परतताना अतिवृष्टी पाहता कोणतीही अडचण होऊ नये यासाठी त्यांच्यासोबत बसमधून प्रवास केला व विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली.