Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

सिंधी बांधवांच्या पवित्र चालिया पर्वात “ सिंध भवन ” ची आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडून सिंधी बांधवाना भेट.

 


उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा


सिंधी बांधवांच्या पवित्र चालिया पर्वात “ सिंध भवन ” ची आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडून सिंधी बांधवाना भेट.नगरविकास विभागाच्या मुलभूत सुविधामधून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर.

उल्हासनगर कॅम्प नं. ५ मधिल महाराष्ट्र शासनाची मालकी असलेल्या सि.टी.एस.क्र.२६२६६ ते २६२८५ अशा एकुण २० सि.टी.एस. क्रमांक असलेल्या शासकीय जागेवर सिंधी संस्कृतीचे माहिती येणाऱ्या पिढीला मिळावी या हेतूने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नांतुन टाउन हॉलच्या धर्तीवर सिंध भवन उभारण्यात येणार असून याकरिता नगरविकास विभागाच्या ‘ महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतुद योजनेअंतर्गत ५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शनिवारी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी उल्हासनगर शिवसेना महानगरप्रमुख श्री. राजेंद्र चौधरी व महानगरपालिकेच्या अभियंत्यासह या नियोजित जागेची पाहणी केली. या ठिकाणी तळमजला + पहिला मजला तसेच सर्व सोयीनी सुसज्ज अशी प्रशस्त इमारत उभारण्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना आमदार डॉ. किणीकर यांनी यावेळी महानगरपालिकेच्या अभियंत्याना दिल्या. 


या पाहणी दरम्यान जेष्ठ नगरसेवक श्री. सतरामदास जेसवाणी, शिवसेना उपशहर प्रमुख श्री. संदीप डोंगरे, युवा सेना उप जिल्हा अधिकारी श्री. युवराज पाटील, उपविभाग प्रमुख श्री. अशोक दवणे, श्री. आदिनाथ कोरडे, श्री. विलास काकडे, श्री. गणेश शिंदे, श्री. राकेश चिकणे, शाखा प्रमुख श्री. विलास पालकर, श्री. विलास जामदार, युवा सेनेचे श्री. जितू सकपाळ, श्री. जितू नाडेकर तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, महानगरपालिका अभियंता श्री. शोकानी आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights