डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी होणार,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने विश्वरत्न महामानव भीमसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने दिनांक १३ एप्रिल ते १८ एप्रिल २०२५ दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे:
१३ एप्रिल २०२५:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास सामुदायिक अभिवादन, बुद्धवंदना तसेच मध्यरात्री १२ वाजता महामानवाला पुष्पहार अर्पण.
१४ एप्रिल २०२५:
सायंकाळी भव्य जयंती मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. मिरवणुकीचा मार्ग: डॉ. आंबेडकर नगर, बुद्धविहार, चोपडा कोर्ट, टर्निंग पॉइंट, डॉ. रघानी दवाखाना, अमन टॉकीज, काछोमल पुतळा, उल्हासनगर महानगरपालिका – समारोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून.
१६ एप्रिल २०२५:
खानदेशचे सुप्रसिद्ध गायक कु. भैया मोरे व समूह (खानदेश तडका) यांचा सादरीकरण.
१७ एप्रिल २०२५:
पुण्याच्या सुप्रसिद्ध गायिका सौ. मंजुषा शिंदे व पार्टी यांचा संगीत कार्यक्रम.
१८ एप्रिल २०२५:
आंबेडकर चळवळीतील विद्रोही गायिका सौ. शितल साठे यांचा नवयान महाजलसा.
मा. नानासाहेब बागुल (अध्यक्ष, स्मारक समिती), मा. पुष्पाताई बागुल, मा. स्वप्निल बागुल आणि मा. श्री. श्रीकांत बागुल.या महोत्सवासाठी नेतृत्व करत आहेत.
कार्यक्रमात मा. नगरसेवक श्री. बी. बी. मोरे, श्री. अंकुश नि. म्हसके, श्री. कलवंतसिंग (बिटुभाई) सहोता, सौ. अंजना म्हसके यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
कार्यक्रमात ब्ल्यू टायगर ग्रुप, मैत्रेय सामाजिक संस्था, भीमज्योत मित्र मंडळ, बौद्धशील मित्र मंडळ, रॉयल बुद्धा ग्रुप, नवतरुण मित्र मंडळ, तसेच डॉ. बी. आर. आंबेडकर शॉपकीपर असोसिएशन, वोल्कानो स्कॉड, लव्ह बॉय ग्रुप, बाबा रुल्स यांचा सहभाग असणार आहे.
या उत्सवात शहरातील विविध मान्यवर, कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भव्य आणि देखणे करण्यात येणार असून, उपस्थितांनी सामाजिक सलोखा, समता आणि बंधुभाव याचे प्रतीक असलेला हा जयंती महोत्सव अनुभवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.