Breaking NewsheadlineHeadline TodaypoliticsSocialUlhasnagarUlhasnagar Breaking News
चंद्रायन -३चे चंद्रावर यशस्वी लँडिंग वैज्ञानिकांचे हार्दिक अभिनंदन,मनसेचा उल्हासनगर मध्ये जल्लोष.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
भारतीय वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमाने चांद्रयानं 3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग करण्यात आले आज साय ६:०४ मी यशस्वी लँडिंग होताच उल्हासनगर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखेच्या वतीने भारत माता जय या घोषणा देत इस्रो च्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करत मिठाई वाटप करत लालचक्की या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आलं.
मा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रदीप गोडसे यांच्या नेतृत्वाखाली लालगड शाखेचे सर्व महाराष्ट्र सैनिक व महिला कार्यकर्ते, विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी, व युवा सेनेचे सर्वच कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमाने चांद्रयानं ३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग होताच वैज्ञानिकाचे हार्दिक अभिनंदन करत नागरिकांना मिठाईचे वाटप करण्यात आले.