शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
२४/३/२३ रोजी M I D C ने खोदलेल्या खड्यामुळे तसेच त्यांनी दाखवलेल्या निष्काळजीपणामुळे २ लहान मुलांचा खड्यात पडून मृत्यू झाला होता. त्यावेळेस प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि तक्रार दाखल होण्यास झालेल्या विलंबामुळे नेवाळी डावळपाडा येथील स्थानीक आणि मृतक मुलांच्या कुटुंबीयांनी दोन्ही मुलांचे मृतदेह अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावर ठेऊन तक्रात दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह रस्त्यावर ठेवण्याचे निश्चित करून रास्ता रोको केला होता. यामुळे संपूर्ण रास्ता वाहतूक कोंडीमुळे बंद पडला होता. अशावेळेस काही ग्रामस्थांनी शहरप्रमुख महेश गायकवाड यांना तेथे बोलावून कुटुंबियांची समजूत काढावयास सांगितली असता महेश गायकवाड यांनी कुटुंबीयांनी भविष्यात न्याय मिळवुन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्याघटनेचा आजपर्यंत पाठपुरावा करून कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि महेश गायकवाड यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने आज १)सन्नी प्रमोद यादव, वय-७ वर्ष २) सुरज मनोज राजभर, वय-८ वर्ष या दोन्ही मृत्यु पावलेल्या मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५-५ लाखाची आर्थिक मदत MIDC च्या ठेकेदाराकडून मिळवून देण्यात आली.
यासमयी शहरप्रमुख श्री.महेश गायकवाड, तालुका प्रमुख श्री. चैनू जाधव, युवासेना तालुका अधिकारी श्री. सुभाष गायकर, विभागप्रमुख श्री.अशोक म्हात्रे, श्री.विलास पाटील, सौ.किरण पांडे, तसेच स्थानिक उपस्थित होते.