अंबरनाथ रेल्वे प्रवाशांना दिलासा CSMT ट्रेन फलाट क्र.२ वरुन सुटणार.
अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ रेल्वे स्थानक इथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई)कडे जाणाऱ्या प्रवाश्यांना होणारा त्रास जाणून घेता अंबरनाथ स्टेशन मास्टर यांच्या सोबत चर्चा करून सकाळी ७ वा. नंतरच्या कारशेड मधून सोडण्यात येणाऱ्या गाड्या ह्या फलाट क्र.३ ऐवजी फलाट क्र.२ वरून सोडण्यात याव्या जेणे करून अंबरनाथ मधिल सर्व प्रवाश्यांना बसण्या करिता पुरेसा वेळ मिळेल आश्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी मा.नगरसेवक श्री चंद्रकांत भोईर,श्री. रविंद्र करंजुले,श्री रविंद्र पाटील, श्री रामदास शिंगवे , मनोज शेलार, युवासैनिक दुर्गेश चव्हाण तसेच प्रवासी नागरिक उपस्थित होते.