आमदार गणपत गायकवाड यांचा शाळा प्रशासनाला दणका.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
कल्याण पूर्वेतील प्रभाग क्र. ९१ जरीमरिनगरमधील नूतन ज्ञान मंदिर शाळेसमोरील महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावर सेंट ज्यूडस शाळेने अनधिकृतपणे हक्क दाखवून तेथील नागरिकांचा पूर्वीपासूनचा वाहिवाटीचा मार्ग सौरक्षक भिंत उभारून अडवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार तेथील स्थानिकांनी आमदार गणपत गायकवाड यांच्या कडे केली होती. तक्रारीची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन आमदारांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज पाहणी केली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या वहिवाटीवरून जवळील नूतन ज्ञान मंदिर,आयडियल इंग्लिश स्कुल,सेंट ज्युस स्कुल,साई इंग्लिश स्कुल व सेंट थॉमस स्कुल या सर्व शाळांसाठी हा वहिवाटीचा मार्ग असल्याचे सांगण्यात आले. सेंट ज्यूड्स शाळेने या वहिवाटेवर अनधिकृतपणे कुंपण बांधण्यास सुरवात केली असल्याचे पाहणी दरम्यान आढळून आले. नागरिकांची होणारी गैरसोय पाहताच आमदारांनी भिंत उभारणाऱ्या ठेकेदाराला व शाळा प्रशासनाला काम त्वरित थांबवून नागरिकांना वहिवाटीचा मार्ग मोकळा करून द्यावा असा विनंतीवजा आदेश दिला.
यावेळी आमदार गणपत गायकवाड यांच्या सोबत माजी नगरसेवक निलेश शिंदे, संदीप तांबे तसेच स्थानिक रहिवाशी उपस्थित होते.