उल्हासनगरात अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळ्याचे वर्क ऑर्डर सह धनादेश सुपूर्त.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच मधील सुभाष टेकडी चौक परिसरात भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा बनवण्या करिता वर्क ऑर्डर मिळाली असून कामाची रक्कम धनादेश स्वरूपात सुपूर्त करण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
यावेळी उल्हासनगर महानगर प्रमुख श्री. राजेंद्र चौधरी, शहर प्रमुख श्री. रमेश चव्हाण,पुतळा समिती सदस्य श्री. अरुण कांबळे, श्री. काकडणीस, श्री. सावंत, डॉ. अहिरे, वास्तुशास्त्र तज्ञ श्री सारंग, तसेच इतर समिती सदस्य, महिला शहर संघटक सौ. मनिषा भानुशाली,मा. नगरसेवक श्री.थाले,मा. नगरसेविका सौ. ज्योती माने,युवासेना शहर अधिकारी श्री. सुशील पवार, शिवसैनिक उमेश कांदे, शिवसैनिक,महिला आघाडी, युवासैनिक तसेच नागरिक उपस्थित होते.