उल्हासनगर चे आमदार कुमार आयलानी यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे कोकण विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी फॉर्म १८ भरणे सुरु.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
दि. १ नोव्हेंबर, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित पदवीधर मतदारसंघाच्या मतदारयाद्या नव्याने तयार करण्याचे काम सुरु झाले असुन कोकण विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी उल्हासनगर शहरातील पदवीधर झालेल्याची नवीन मतदार नोदणी करावयाची असून १ नोव्हेंबर, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित कोकण विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी मतदारयादीत नाव नोंदविणे याकरिता पात्र व्यक्तीने (१ नोव्हेंबर २०२३ पूर्वी किमान ३ वर्ष भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची पदवीधर किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली अर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती) फॉर्म नमुना नंबर १८ चा अर्ज व संबंधित कागदपत्रे जोडून आमदार कुमार आयलानी यांच्या जनसंपर्क कार्यालय, सचदेव कॉम्प्लेक्स, नवीन टेलिफोन एक्सचेंज जवळ उल्हासनगर ४२१००१ या ठिकाणीं जमा करावे.
उल्हासनगर शहरातील जास्तीत जास्त पदवीधर नागरिकांनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन आमदार कुमार आयलानी केले आहे.
आवश्यक कागदपत्रे –
१) स्वाक्षरीसह दीक्षांत समारंभाच्या गुणपत्रिकेची प्रत/पासिंग सर्टिफिकेट / कन्व्होकेशन सर्टिफिकेट (या पैकी एक)
२) ड्रायव्हिंग लायसन्स/पासपोर्ट/पॅन कार्ड/आधार कार्ड(या पैकी दोन)
३) निवडणूक ओळखपत्र(आवश्यक)
४) रेशन कार्ड / लाईट बिल/एमटीएनएल बिल/एमजीआय बिल( या पैकी एक )
५) ऑक्टोंबर 2020 नंतर पदवीधर झालेल्या व्यक्ती कोकण पदवीधर नोदणीस पात्र नाही
फॉर्म १८ आमदार कुमार कुमार आयलानी यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे उपलब्ध आहेत.फोन नंबर – 0251-2563838/2564848.