उल्हासनगर च्या सेंट्रल हॉस्पिटल मध्ये येणारी गर्दी कमी करणे साठी उपाययोजना.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ, बदलापूर, कल्याण, खरडी, गोवेली, शहापुर, कसारा परिसरात अनेक शासकीय जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहेत, व अनेक रुग्णालये शासनकृत नोंदणी केलेली आहेत, असे असताना सुद्धा उल्हासनगर च्या मध्यवर्ती रुग्णालय येथेच ग्रामीण भागातील रुग्ण जास्त दिसुन येतात, ह्या वस्तुस्थितिचा शोध घेणे आवश्यक आहे,जिल्ह्यातील बाकी ग्रामीण रुग्णालये अध्ययावत केल्यास उल्हासनगर च्या सेंट्रल सरकारी दवाखान्यात येणारी गर्दी कमी होउ शकते, बेड कमतरता यावर थोडासा आळा बसेल.
कृपया शासन प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी राज्य आरोग्य विभागास सामाजिक संस्थाद्वारे केली जात आहे,महामाया असंगठित महिला कामगार संघटना, एडवोकेट वनिता ओवळेकर, द समर्पण फाउंडेशन व प्रशांत चंदनशिवे यानी ईमेल द्वारे प्रशासनास सदर सुचना केल्या आहेत.