ऐतिहासिक भारत जोडो यात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त उल्हासनगर काँग्रेसची पदयात्रा.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
काँग्रेस नेते खा. श्री राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत काढलेल्या भारत जोडो यात्रेला दी. ७ सप्टेंबर रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या ऐतिहासिक यात्रेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष श्री. नाना पटोले, प्रभारी हुसेन दलवाई व सह प्रभारी मनोज शिंदे यांच्या आदेशाने तसेच निरीक्षक माजी आमदार श्री. युसुफ अब्रहनी यांच्या उपस्थितीत उल्हासनगर काँग्रेस ने जिल्हास्तरीय भारत जोडो पदयात्रा व कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती.काँग्रेस कार्यालयात श्री. युसुफ अब्रहनी यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला.
नेहरू चौक येथील पंडित नेहरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरू झालेली पदयात्रा गजानन मार्केट सिरू चौक मार्गे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष श्री. श्याम मढवी यांच्या कार्यालय येथे समाप्त झाली. तसेच यावेळेस कॉर्नर सभेचे आयोजन देखील करण्यात आले.
भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक असून देशातील द्वेषाचे वातावरण कमी करण्यासाठी श्री. राहुलजी गांधी यांनी प्रयत्न करत आहेत आणि त्यांना नक्कीच यात यश मिळेल व INDIA आघाडी येणारी लोकसभा निवडणूक जिंकेल व नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून झेंडा फडकवनार नाही हे निश्चित झाले आहे, असे युसुफ अब्रहनी यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वात या पद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस काळात ३५० रुपयांना मिळणारे सिलेंडर मोदींच्या काळात ११०० रुपयात विकले गेले व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून २०० रुपये कपात केले हा खेळ जनता समजली आहे,तसेच देशाला अखंडित ठेवण्यासाठी व सामाजिक सौहार्द वाढवण्यासाठी राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महत्वाची व ऐतिहासिक आहे असे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी सांगितले.
यावेळेस श्री युसुफ अब्राहणी ( माजी आमदार),रोहित साळवे – जिल्हाध्यक्श,राधा चरण करोतिया – प्रदेश अध्यक्ष सफाई कामगार सेल,वअझरुद्दीन खान – प्रदेश सदस्य,,किशोर धडके – साऊथ ब्लॉक अध्यक्ष,रोहित जुरयाने – सेंट्रल ब्लॉक अध्यक्ष,फामिदा शेख,राजेश मल्होत्रा- प्रवक्ता उल्हासनगर,अहमद खान- जिल्हाध्यक्ष अल्पसंख्या विभाग ,नियाज खान – उपाध्यक्ष ,प्रा नारायण गेमनानी , टी एम राय ,शंकर आहुजा- सेवादल अध्यक्ष,मनीषा महाकाळे- महिला अध्यक्ष सेवा दल,सिंधुताई रामटेके – अध्यक्षा निराधार मिरची विभाग,विशाल सोनवणे- अध्यक्ष पर्यावरण विभाग,राकेश मिश्रा – अध्यक्ष उद्योग सेल ,निलेश जाधव- अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग,डॉक्टर धीरज पाटोळे – अध्यक्ष डॉक्टर सेल,संतोष मिंडे-रास्त धान्य दुकानदार विभाग,दीपक सोनवणे – जिल्हा महासचिव,आबा साठे – अध्यक्ष परिवहन सेल यांच्या सकट मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्तिथ होते.