कोण्या एकामुळे सगळेच बदनाम होतात. परंतु, कोण्या एकाच्या चांगल्या कर्मामुळे बाकीच्यांना सुद्धा चांगले कर्म करण्याची सुबुद्धी सुचते या विचाराने शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या कडून त्या रिक्षा चालकांचा सत्कार.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
२८ तारखेच्या मध्यरात्री एक गरोदर महिला प्रसूतीच्या वेदना असह्य झाल्याने इस्पितळात दाखल होण्यासाठी कल्याण पश्चिम येथे जात असताना वेळ भरल्यामुळे रस्त्यावरच बाळंत झाली. त्यावेळेस तेथे उपस्थित असलेल्या रिक्षाचालक विजय तावडे आणि संजय जगताप यांनी प्रसंगावधान राखुन नवजात बालकाला आणि मातेला शाल आणि कपडे उपलब्ध देऊन, रुग्णवाहिका बोलावून त्यांना योग्य ठिकाणी पोहचण्यास मदत मिळवून देऊन त्यांच्या प्राणाची रक्षा केली. ही माहिती मिळताच शहरप्रमुख/ रिक्षा चालक-मालक शहर संघटक श्री.महेश गायकवाड यांनी आज सकाळी कोळसेवाडी रिक्षा स्थानकात जाऊन दोन्ही कर्तबगार रिक्षा चालकांचा शाल, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम देऊन सत्कार केला.
या समयी, श्री.सुबल डे, श्री. जितेंद्र पवार, श्री. शिवदास गायकवाड, उपशहर संघटक – प्रशांत बोटे तसेच रिक्षा चालक-मालक बांधव उपस्थित होते.