गणेश उत्सवापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करा अन्यथा मनसे पद्धतीने आंदोलन करू.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय.गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक सण आहे व सर्व जाती धर्माचे लोक हा उत्सव मोठया उत्सहात साजरा करतात.परंतु ज्या रस्त्यांवरून गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे त्या रस्त्यांची मोठया प्रमाणात दूरअवस्था झाली आहे. उल्हासनगर महानगरपालिका दरवर्षी शहरातील रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी करोडो रुपये खर्च करते परंतु शहरातील रस्ते काही सुधरायला तयार नाहीत असा खोचक प्रश्न मनसेचे माजी शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी महापालिका आयुक्तांना विचारलाय.शहरातील रस्त्यावरील खड्डयांमुळे रोज छोटे-मोठे अपघात होत असतात व यामुळे नागरिकांना गंभीर दुःखापतही होते. खराब रस्त्यांमुळे वाहनाचेही मोठया प्रमाणात नुकसान होते व हे कुठेतरी थांबलं पहिजे.जर 19 सप्टेंबर पूर्वी म्हणजेच गणपती बाप्पाच्या आगमना पर्यंत शहरातील सर्व रस्ते सुस्थीतित करण्यात आले नाही व जर शहरातील नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा ईशारा मनसेच्या वतीने महापालिका आयुक्त अजिज शेख व शहर अभियंता संदीप जाधव यांना निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलाय.यावेळी जिल्हा सचिव संजय घुगे,मा.शहर अध्यक्ष बंडू देशमुख, मनविसे जिल्हा संघटक मनोज शेलार मा.शहर संघटक मैनऊद्दीन शेख, वाहतूक सेनेचे काळू थोरात, कामगार नेते दिलीप थोरात यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.