डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने तसेच राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांच्या श्रमदानातून शनिवारी किल्ले कोथळीगड येथे गडसंवर्धन मोहीम हाती घेण्यात आली.
कर्जत: नीतू विश्वकर्मा
कल्याण लोकसभेचे शिवप्रेमी खासदार मा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने तसेच राष्ट्रीय छावा संघटना महाराष्ट्र यांच्या श्रमदानातून शनिवारी किल्ले कोथळीगड येथे गडसंवर्धन मोहीम हाती घेण्यात आली. या वेळी कर्जत तालुक्यातील पेठ गावातील कोथळीगड या किल्ल्याची मोहिम हाती घेण्यात आली. यावेळी सर्व शिवप्रेमींनी चालत प्रवास करत गडाकडे जाणाऱ्या पायवाटेत येणाऱ्या झाड- झुडपांच्या फांद्यांची छटाई करण्यात आली तसेच गडाकडे जाण्याचा मार्गावर असलेल्या प्रत्येक वास्तू चे महत्व , माहिती आणि नाम निर्देशक फलक लावण्यात आले .
तसेच गडाच्या मुख्य वाटेवर डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन च्या वतीने सूचना फलक ही लावण्यात आला. या फलकावर गडावर येणाऱ्या ट्रेकर्स /गडसंवर्धन करणारे किंवा गडावर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी घ्याव्याची काळजी आणि पाळावयाचे नियम सांगण्यात आलेले आहे. यासोबतच गडाकडे जाण्याचा मार्ग / महादरवाज्याकडे जाण्याची वाट / भैरवनाथाचे मंदिर तसेच पाण्याच्या टाक्यांमध्ये पाय टाकून बसू नये, त्यात कोणातेही अनुचित प्रकार करू नये / गडावर कुठेही लिखाण करून पुरावशेष विद्रूप करू नये / तोफेवर बसून किंवा पाय ठेवून फोटो सेल्फी काढू नये, अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल असे फलक लावण्यात आले.
आपणही गडावर जाताना सोबत नेलेली पाण्याची बाटली, प्लास्टिक पिशवी, अविघटक वस्तू गडावर किंवा वाटेत फेकून न देता ते पुन्हा गड उतार होताना गावात असलेल्या कचराकुंडीत फेकाव्यात. जेणेकरून गडाचे संवर्धन आणि पर्यावरणाचे ही संरक्षण होईल.
गडावर असलेल्या पाण्याच्या टाकीतील पाणी आजही पायथ्यालगत असलेले पेठ गावातील लोक पिण्याकरता वापरतात त्यामुळे ते पाणी स्वच्छ ठेवणे, टाक्यांनभोवती कचरा न करणे ही आपली जबाबदारी आहे.