सार्वजनिक आरोग्य विभाग उल्हासनगर महानगरपालिका व वेदांत कॉलेज यांच्या सयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहिमेत वेदांता महाविद्यालय येथे महारक्त दान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते .
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत स्वच्छता ही सेवा मोहिमेत सार्वजनिक आरोग्य विभाग उल्हासनगर महानगरपालिका व वेदांत कॉलेज यांच्या सयुक्त विद्यमाने मा. आयुक्त श्री अजीज शेख सर , श्री . जमीर लेंगरेकर सर यांच्या संकल्पनेतून व मा. उपायुक्त आरोग्य श्री. डॉ. सुभाष जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांता महाविद्यालय येथे महारक्त दान शिबीराचे दिनांक २७/०९/२०२३ रोजी ठिक स. ९.०० ते दुपारी २.०० वाजे पर्यंत आयोजन करण्यात आले होते .
यात महापालिकेचे विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच वेदांत महाविद्यालयाचे विद्यार्थी जवळपास ७० ते ७५ रक्तदाता यानी सहभाग घेऊन स्वच्छेने रक्त दान केले .
याप्रसंगी मा. श्री जमीर लेंगरेकर अतिरिक्त आयुक्त , मा. श्री अशोक नाईकवाडे उपायुक्त (मुख्यालय ) , वेदांत महाविद्यालयाच्या मुख्यध्यापिका श्रीमती संगीता कोळी – व श्रीमती छाया डांगले जनसंपर्क अधिकारी यांनी महापालिकेचे अधिकारी श्री. मनीष हिवरे सा.सार्व.आरोग्य अधिकारी, श्री विनोद केणे , बाजार निरिक्षक , श्री एकनाथ पवार , मुख्य स्वच्छता निरीक्षक व श्री रवींद्र बहेणवाल , विजय बहेनवाल , श्री नरेश परमार स्वच्छता निरीक्षक व श्री चंदन नारंग व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना सर जे .जे . महानगर रक्त केंद्र, राज्य रक्त संक्रमण परिषद (महाराष्ट्र शासन) भायखळा , मुंबई या राज्य रक्त संक्रमण परिषदे तर्फे प्रमाणपत्र देऊन सन्मानित केलें.