सार्वजनिक गणेशोत्सव २०२३ – म्हारळ ग्रामपंचायत आढावा आणि नियोजन बैठक आयोजित करण्यात आली.
कल्याण ग्रामीण : नीतू विश्वकर्मा
म्हारळ ग्रामपंचायतच्या पुढाकाराने गणेशोत्सव संदर्भात स्थानिक पोलीस यंत्रणा, पोलीस पाटील, गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, तसेच विविध पक्षाचे प्रतिनिधी, समाजसेवक आणि नागरिकांची समन्वय आढावा बैठक घेण्यात आली.
ह्यावेळी म्हारळ ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री. नितीन चव्हाण यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन केले. तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. निलीमा नंदू म्हात्रे यांनी खालील सूचना-वजा-सांकल्पना मांडल्या:
१. मंडळांना पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करणे.
२. निर्माल्य संकलन करण्यासाठी ग्रामपंचायत कडून निर्मल मांगल्यकलश प्रत्येक मंडळाला देण्यात येईल.
३. स्वच्छतेच्या दृष्टीने कचऱ्याचे डब्बे देऊन ग्रामपंचायतची एक स्वतंत्र गाडी तो कचरा संकलन करण्यासाठी दहा दिवस ठेवण्यात येईल.
४. लहान मुलांसाठी गणपतीची मूर्ती बनवण्याची स्पर्धा व अथर्वशीर्ष गणपती स्त्रोत पठण यासारख्या स्पर्धांचा आयोजन केले जाणार आहे.
५. या दहा दिवसांमध्ये नियोजित वेळेप्रमाणे अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले.
६. विद्येची देवता विद्येचा नैवेद्य या संकल्पने अंतर्गत हार नारळ यासारख्या नैवेद्य न आणता वह्या पुस्तके अशा प्रकारचा नैवेद्य अर्पण करून गोरगरीब जनतेमध्ये त्याचे वाटप करणे.
७. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी शकत्यो आपल्या मंडपात व आसपास CCTV कॅमेरे लावावे असे आवाहन करण्यात येत आहे.
ह्यावेळी म्हारळचे उपसरपंच श्री. योगेश अशोक देशमुख ह्यांनी सुद्धा सूचना दिल्या.
येणारा गणेशोत्सव हा आनंदात शांततेत आणि शिस्तीत पार पाडावा अशा प्रकारच्या सूचना दिल्या मंडळांच्या सूचनांची नोंद घेतली. म्हारळगावात प्रथमच अश्याप्रकारे नियोजन करण्यात येत असल्यामुळे उपस्थितांनी आभार व समाधान व्यक्त केले.