स्वस्त धान्य दुकाने अंबरनाथ तसेच उल्हासनगर दिवसातून ८ तास चालू राहिलेच पाहिजेत:- जयेश बालाराम जाधव
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
२७/०९/२०२३ रोजी जयेश जाधव कल्याण लोकसभा क्षेत्र अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) यांच्या वतीने मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना निवेदन देण्यात आलं असून उल्हासनगर तसेच अंबरनाथ मधील सरकार मान्य स्वस्त धान्य दुकाने ही नियमाप्रमाणे दिवसातून आठ तास चालू असणे नियम आहे पण सदर दुकाने ही नियमाप्रमाणे चालू नसतात त्यामुळे नागरिकांची गैर सोय होते त्यामुळे सदर दुकाने ही सुट्टीचे दिवस वगळून आठ तास चालू रहावी म्हणून मुख्यमंत्री महोदय यांना मागणी करण्यात आलेली असुन नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन जर दुकाने आठ तास चालू राहिली नाही तर भविष्यात आंदोलनाचा इशारा ही देण्यात आलं आहे.