३ महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी केले बाळास बलवान.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
गेल्या तीन महिन्यापासून उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात ममता निकम नामक महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचे वजन मात्र पाचशे ग्राम असल्याने डॉक्टरांना मोठी कसरत करावी लागली. असे बोलतात ना देव तारी त्याला कोण मारी याच म्हणी प्रमाणे उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयातील देवरूपात आलेल्या डॉक्टरांनी मागील तीन महिन्यांपासून त्या बाळाची आणि मातेची काळजी घेत आहेत. ५०० ग्रॅम असलेल्या त्या बाळाचे वजन अवघ्या तीन महिन्यात त्या बाळाचे वजन दीड किलो पर्यंत वाढल्याने अखेर त्या मातेला आज घरी डीचार्ज देण्यात आला.SNCU नवजात शिशु विभागातील विभागातील डॉक्टर वसंतराव मोरे, डॉ.वैशाली पवार, डॉ. किरण, डॉ.खान, डॉ. पूजा मॅडम, डॉ.सुमित, नर्स केलसिकर, शिंदे, घोष, अधिक सर्व कर्मचाऱ्यांनवर जिल्हा चिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांनी संपूर्ण टीमला कौतिकीची थाप दिली आणि त्या मातेने आभार व्यक्त केले.