UMC, झाडांची कत्तल..! जाहिराती करणाऱ्या ठेकेदारांचा माजर्डेपणा…! वंचित बहुजन आघाडी उचलला आवाज..!
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिकेने जाहिरात करणाऱ्या ठेकेदारांना जाहिरातीसाठी ठेका दिला आहे. त्या मुजोर ठेकेदार आता दिवसाढवळ्या रस्त्यालगतच्या झाडांची सर्रासपणे कत्तल डॉ.आंबेडकर नगर (चोपडा) या ठिकाणी करत आहेत
या विरोधात वंचित बहुजन आघाडीने ठेकेदारांना रोखण्यासाठी विरोध केला व उल्हासनगर महापालिके तक्रार करू असं सांगितल्यावर त्या ठेकेदाराने काय करायचं ते करा मला काही करू शकत नाही अशा भाषेत उत्तर देत त्याने त्या झाडांची कत्तल सुरूच ठेवली आहे. (चोपडा) स्थानिक ठिकाणाचे हाल अंधेरी नगरी चौपट राजा असे झाले आहेत. कुणी ही कधी ही बेकायदेशीर काम करत आहेत या सर्व बेकायदेशीर कारवाई होत असतांना कुठल्याच प्रतिनिधीच किंवा प्रशासनाच्या अधिकाऱ्याचे लक्ष नाही जर लवकरात लवकर हे बंद झालं नाही तर वंचित बहुजन आघाडी उल्हासनगरच्या वतीने उल्हासनगर महापालिकेवर मोठा मोर्चा काढण्यात येणार याची नोंद घ्यावी.