उल्हासनगरातील पदपथ अतिक्रमण मुक्त महापालिकेची कारवाई, ४४ हजाराचा दंड वसूल.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते, चौक तसेच सव्र्व्हस सेंटर व पदपथावरील अतिक्रमणावर कारवाई करणेसाठी मा. आयुक्त श्री. अजीज शेख यांनी सर्व सहायक आयुक्त, प्रभाग समिती यांना आदेश दिले होते. त्यानुसार आज दिनांक २७/१०/२०२३ रोजी अतिरिक्त आयुक्त श्री. जमीर लेंगरेकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त, प्रभाग समिती यांनी प्रभाग समिती क्षेत्रामध्ये रस्त्यांवरील अतिक्रमण हटविणेसाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेत उल्हासनगर शहरातील सर्व प्रमुख रस्ते, चौक, पदपथ येथील दुकानदारांचे सस सेंटरवाल्याचे गजवाल्यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. तसेच रस्ते फेरीवाला मुक्त करण्यात आले आहेत. या विशेष मोहिमेत दंडात्मक करावाईपोटी रु. ४४,०००/- एवढा दंड वसूल करण्यात आलेला आहे.
तसेच शहरातील नागरीकांना सूचित करण्यात येते की, यापुढे देखिल उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रमुख रस्ते, चौक, पदपथ येथील दुकानदार, सव्र्व्हस सेंटर, गॅरेजवाले यांनी केलेल्या अतिक्रमणावर महापालिकेमार्फत धडक कारवाई सुरु राहणार आहे. याची शहरातील नागरीकांनी नोंद घ्यावी.