ज्येष्ठ समाजसेविका ,निवृत्त प्राध्यापिका सिंधुताई रामटेके यांचा प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.
.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कज्येष्ठ समाजसेविका ,निवृत्त प्राध्यापिका सिंधुताई रामटेके यांचा प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.मिटी निराधार व निराश्रित व्यक्ती विकास विभाग पदग्रहण समारंभ ,आज दि.११/४/२०२३ रोजी टिळक भवन दादर येथे मोठ्या उत्साहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मा.श्री.नानाभाऊ पटोले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी निराधार व निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा.राधिकाताई मखमले यांनी आयोजित केला होता.
उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी निराधार व निराश्रित व्यक्ती विकास विभागाच्या उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष म्हणून प्रा.सिंधूताई रामटेके यांची निवड उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी केली व त्याच अनुषंगाने,आज प्रांताध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते प्रा सिंधूताई रामटेके यांचा पक्षप्रवेश करण्यात आला तसेच त्यांच्या व मा.राधिका मखमले यांच्या हस्ते त्यांना जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी मा.नगरसेवीका अंजली साळवे तसेच कमिटीच्या पदाधिकारी उपाध्यक्ष लक्ष्मी गवई व सचिव कालिंदी गवई उपस्थित होत्या.
यावेळी व्यासपीठावर आपले मत व्यक्त करताना प्रा सिंधुताई यांनी संविधानाने जी लोकशाही व्यवस्था देशाला दिली,ती व्यवस्था कुठेतरी डळमळीत होताना दिसते आहे. लोकशाहीचे चार स्तंभ खिळखिळे करण्याचा प्रयत्न होतो आहे. राहूल गांधीजींनी भारतात पदयात्रा काढून माणूस जोडण्याचा प्रयत्न केला त्या मार्गाने जनसामान्य लोकांपर्यंत जाऊन काम करणे हा प्रवेश करण्यामागचा एकमेव उद्देश आहे अशे सांगितले.
प्रा सिंधूताई रामटेके ह्या निवृत्त प्राध्यापिका असून अंधश्रद्धा निर्मुलन समिती वर कार्यरत असून त्यांनी ५ वर्षे महिला व बालकल्याण समिती तसेच हुंडा निर्मूलन समिती ,अपारंपरिक ऊर्जा समिती ,शांतता समिती अश्या अनेक क्षेत्रात काम केले आहे, अनेक सामाजिक कार्यात त्या अग्रेसर असतात.प्रा सिंधूताई रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर मध्ये काॕग्रेस पक्षातर्फे अनेक निराधार व निराश्रित व्यक्तींना न्याय मिळेल व पक्ष संघटना अजून मजबूत होईल यात काही शंका नाही.