Kalyan MLA News: दहीहंडी समन्वय समिती (महा) या समितीवर माननीय आमदार गणपत गायकवाड यांची समितीचे सल्लागार म्हणून जवाबदारी सोपविण्यात आली.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
दहीहंडी हा नुसता एक उत्सव राहिला नसून त्याला एक साहसी खेळ (Sports) म्हणून दर्जा मिळाला आहे. आज गोविंदा मातीतून मॅटवर आला आहे. लवकरात लवकर या खेळाला ऑलिंपिक्स (Olympics) स्तरावर नेण्यासाठी दहीहंडी (Dahi Handi) समन्वय समिती (महा) कार्यान्वयीत आहे. आज दहीहंडी समन्वय समिती (महा) या समितीवर आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांची समितीचे सल्लागार म्हणून जवाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच माननीय आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण तालुक्यासह भिवंडी, उल्हासनगर,अंबरनाथ, मुरबाड व शहापूर या तालुक्यांमध्ये स्वतंत्र दहीहंडी समितीची स्थापना करून त्या मुख्य समितीशी संलग्न करण्याची जबाबदारी देखील माननीय आमदार गणपत गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. समितीने माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि दिलेली जवाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडेन असे आश्वासन आमदारांनी समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर याना दिले.
यावेळी समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर, सचिव सुरेंद्र पांचाळ, सचिव गीता झगडे, कार्याध्यक्ष डेव्हिड फर्नांडिस, सदस्य राजेश सोणावडेकर, विनोद झगडे, विवेक नाक्ती, निरंजन आहिर व विजय साळावकर आदी मान्यवर उपस्थित होते.