Kalyan News: डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंतीचे औचित्य साधून मातोश्री गुंजाई फाऊंडेशन व कल्याण शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या वतीने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा.
कल्याण: नीतू विश्वकर्मा
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती(APJ Abdul Kalam Birth Anniversary) निमित्त शिवसेना कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड (kalyan Shivsena City Ptesident Mahesh Gaikwad) यांचा कार्यक्षेत्रातील इयत्ता दहावी आणि १२ वी मधील विशेष गुण संपादन करून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा भेट वस्तू देवून सत्कार केला या मध्ये माझ्या कार्यालयात प्राप्त झालेल्या गुणपत्रीकेनुसार इयत्ता बारावीत प्रथम आलेली श्रृती मनोज देशमुख,दृतीय आलेली प्रिती मनोज जाधव तसेच तृतीय आलेली वृषाली रमेश कांबळे तसेच इयत्ता दहावीत प्रथम आलेली दिक्षा संदिप जोगळे, द्वितीय आलेला आर्यन उत्तम कोळी तसेच तृतीय क्रमांक आलेली गौरी प्रमोद घाडीगावकर या विद्यार्थ्यांचा विशेष असा सत्कार केला.
या समयी मातोश्री गुंजाई फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवदास गायकवाड, उपशहर संघटक प्रशांत बोटे, शाखा प्रमुख प्रशांत अमिन, विभाग प्रमुख शंकर पाटील, उप विभाग प्रमुख कृष्णा पाटील, उप विभाग प्रमुख विजय गोसावी, शाखा प्रमुख प्रभू शेटीयार, महिला विभाग प्रमुख सुजाता शिंदे, उप विभाग प्रमुख सिमा सोनवणे , शाखा प्रमुख निर्मला नवाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.