Ulhasnagar: प्रभाग क्र.२० मधील पाणी समस्ये विरोधात दे धडक मोर्चा.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर मधील प्रभाग क्र.२० मध्ये काही विभागात पाण्याची समस्या ही सहा महिन्यांन पासून असून पालिका प्रशासन यांना वारंवार कल्पना देऊन ही समस्या सुटत नाही तसेच पाण्यासाठी नागरिकांची होणारी वणवण पाहता दिनांक:-०६/१०/२०२३ रोजी सकाळी ११ वा. परिसरातील नागरिकांच्या वतीने दे-धडक मोरच्या (Morcha) आयोजन केले असून प्रभागातील नागरिकांना विनंती आहे की आपल्याला पाण्याची समस्या आहे हे दाखवून देण्यासाठी सदर दे-धडक मोरच्या मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित रहा. मोर्चा चा मार्ग हा दुर्गादेवी पाडा-कैलास कॉलोनी-कुर्लाकॅम्प (Kurla Camp Ulhasnagar) मार्गे-पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय प्रभात गार्डन असा असेल.