Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking NewspoliticsUlhasnagarUlhasnagar Breaking News
Ulhasnagar kalyan YuvaSena News: उल्हासनगरच्या कचऱ्यामुळे खडेगोळवली-विठ्ठलवाडी परिसरातील लोकांना होतोय त्रास…!UMC च्या आयुक्तांना कल्याण पूर्वाच्या युवसैनिकानी घेतली भेट…!
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगर पालिकेचे (ulhasnagar Muncipal Corporation) आयुक्त अजीज शेख यांची युवासेना कल्याण पूर्वच्या (Kalyan East Yuvasena) शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीत खडेगोळवली-विठ्ठलवाडीला (khadegolwali-vitthalwadi) लागून असलेल्या उल्हासनगर – ४ (ulhasnagar 4) वाको कंपाऊंड इंडस्ट्रिअल एरिया येथे रस्त्यावर भयंकर दुर्गंधी पसरली आहे. खडेगोळवलीच्या आई गावदेव मातेचे मंदिर याच रस्त्यावर असून भक्तांना आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मंदिराच्या बाजूलाच ट्रान्सफॉर्मर आहे. दर महिन्याला कचऱ्यामुळे येथे आग पेटते व बऱ्याच वेळा या आगीमुळे ट्रान्सफॉर्मर पेट घेतो. काही महिन्यांपूर्वी आगीमुळे ट्रान्सफॉर्मर ची एक बाजू कोसळली होती. याबाबत देखील सकारात्मक चर्चा करण्यात आली आणि योग्य ती उपाययोजना करून समस्या सोडविण्यात येईल असे आश्वासन आयुक्त महोदयांनी दिले.
तसेच वालधुनी नदीत (Waldhuni River) रॅबिट टाकल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज नगर व अशोकनगर येथील नागरिकांच्या घरात पुराचे पाणी भरण्याचा प्रमाण वाढला असून प्रचंड नुकसान सहन करावा लागत आहे. याबाबत रॅबिट काढून नदी पात्र स्वच्छ करावा, जेणेकरून नदीच्या वाढलेल्या पात्रामुळे पुराच्या पाण्याचे प्रमाण कमी होईल व नागरिकांना दिलासा मिळेल, अशी विनंती केली. आयुक्त महोदयांनी तातडीने अधिकाऱ्यांना रॅबिट काढून नदी पात्र स्वच्छ करण्याचे आदेश देखील दिले.
या प्रसंगी युवासेना उपजिल्हा अधिकारी भूषण यशवंतराव, शहर अधिकारी रोहित डुमणे, शहर समन्वयक विकी जोशी, शहर सचिव मधुर म्हात्रे, उपशहर अधिकारी तेजस देवकते, रोशन पांडे आणि युवासैनिक आदी उपस्थित होते.