उल्हासनगर महानगरपालिकेचा उल्हासनगर राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
प्रधानमंत्री टी.बी मुक्तभारत अभियान अंतर्गत निक्षय मित्र नोंदणीबाबत व संसर्गजन्य आजारांमुळे होणा-या मृत्युमध्ये क्षयरोगांमुळे समावेश प्रमुख १० आजारांमध्ये आहे.त्यामुळे संपूर्ण जगामध्ये व भारतामध्ये क्षयरोग क्षयरोग आजारामुळे होणा-या मृत्युंचे प्रमाण लक्षणीय आहे.
क्षयरुग्णांना उपचार कालावधीमध्ये पुरेसा पोषक आहार मिळाल्यास रोग बरे होण्याचे प्रमाण वाढते व रोगामुळे होणारी अनुषंगिक गुंतागुंत टाकता येते. उपचाराखाली असलेल्या व सामाजिक साहाय्य मिळावे यासाठी संमती दिलेल्या क्षरुग्णांना उपचार कालावधीमध्ये पोषण आहार व इतर साहाय्य मिळावे यासाठी मा.राष्ट्रपती महोदयांनी दिनांक ०९ सप्टेंबर २०२२ रोजी प्रधानमंत्री टी.बी मुक्त अभियानाची सुरुवात केली आहे केंद्र शासनाने क्षयरुग्णांना प्रति व्यक्ती,प्रति महिना आवश्यक खालीखालीलप्रमाणे धान्य,कडधान्य,डाळी,तेल इत्यादी पोषण आहार निक्षयमित्राच्या माध्यमातून देण्याचे प्रयोजन आहे.