Breaking NewsheadlineHeadline TodaysportsUlhasnagarUlhasnagar Breaking News

Ulhasnagar Sports News: क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रिडा परिषद ठाणे व उल्हासनगर महानगरपालिका क्रिडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा


क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रिडा परिषद ठाणे व उल्हासनगर महानगरपालिका क्रिडा विभाग (Ulhasnagar Mahanagar Palika Sports Department) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय (State Level) रग्बी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या रग्बी खेळाचा अंतिम सामना आज पार पडला. यात १४ वर्षाखालील वयोगटामधून सेच्यूरी रेयॉन हायस्कुल, शहाड हा संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. तर ब्लुमिंग बड हायस्कुल, उल्हासनगर हा संघ उपविजयी झाला. याच स्पर्धेत नेताजी हायस्कूल उल्हासनगर हा संघ तृतीय क्रमाकांचा मानकरी ठरला. १७ वर्षाखालील वयोगटामधून सेंच्यूरी रेयॉन हायस्कुल शहाड हा संघाचा विजेतेपदाचा मानकरी ठरला. तर स्वामी शांतीप्रकाश विद्यालय उल्हासनगर हा संघ उपविजेता संघ ठरला. याचसोबत ब्लुमिंग बड हायस्कुल उल्हासनगर या संघाने तृतीय क्रमांकावर आपली मोहोर उमटवली.यात १९ वर्षाखालील वयोगटामधून एस.एस.टी.न्यु कॉलेज उल्हासनगर या संघाने प्रथम क्रमांकावर आपली मोहोर उमटवली. तर आर के.टी.न्यू कॉलेज उल्हासनगर या संघाने उपविजयी संघ म्हणून मजल मारली. याचसोबत वेदांता न्यू कॉलेज उल्हासनगर या संघाने तृतीय क्रमाक पटकावला. या सर्व विजयी संघाचे मन:पूर्वक अभिनंदन!







Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights