क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौकाच्या नुतनीकरणाचे काम पुर्णत्वास एक सुंदर स्मारक साकरले गेल्याचा मनस्वी आनंद.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर कँम्प नंबर – ४ मधिल व्हिनस सिनेमा – लालचक्की चौक मार्गावर असणाऱ्या क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौकाच्या नुतनीकरणाच्या कामाचा क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल स्मारक समितीच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करून उल्हासनगर महानगरपालिके कडून मंजुरी मिळाल्यानंतर दिनांक १ डिसेंबर २०२२ रोजी क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कल्याण पुर्वचे आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला होता.
त्यानंतर दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी ठरल्याप्रमाणे संबंधित ठेकेदाराने नुतनीकरण कामाला सुरुवात केली एक सुंदर आणि आकर्षक स्मारक साकारण्यात येऊन उल्हासनगर शहरातील नाभिक समाज बांधवांना या स्मारकाच्या रुपाने एक स्फूर्ती स्थान मिळणार याचा मनोमनी आनंद होता.परंतु काही तांत्रिक बाबींमुळे स्मारकाचे काम सुरू होऊन देखील कामाला गती मिळत नव्हती.यादरम्यान संबधित ठेकेदारासोबत कधी सौजन्याने तर कधी कठोर भुमिका घेत कामाला होणाऱ्या विलंबा बाबत शाब्दिक चकमक झाली. महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी वर्गाकडे तकादा लावला.अखेर प्रयत्नांना यश येऊन आज सुंदर आणि आकर्षक स्मारक स्थापन झाले.
चौकाचे निर्माते मा.नगरसेवक,कायद्याने वागाचे संस्थापक मा.राज असरोंडकर,चौकाची संकल्पना मांडणारे आमच्या क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल स्मारक समितीचे सचिव मा.अनिल बोरनारे यांचे विशेष आभार त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा चौक निर्माण झाला.आणि मला त्याला एक सुंदर स्मारकात रुपांतरीत करण्याची प्रेरणा मिळाली.यासाठी मी पुन्हा एकदा राज असरोंडकर आणि अनिल बोरनारे यांचे खुप खुप आभार मानतो. तसेच नुतनीकरणाच्या कामाला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल उल्हासनगर महानगरपालिकेचे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचे देखील आभार त्याचबरोबर क्रांतिकारक हुतात्मा वीर भाई कोतवाल चौक स्मारक समितीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांचे खुप खुप आभार तसेच समस्त समाज बांधवांचे मन:पूर्वक अभिनंदन.