क्रिकेट रसिकांसाठी परवणी स्व.रोहित भाई भोईर प्रतिष्ठान आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
स्वर्गीय रोहित भाई भोईर प्रतिष्ठान आयोजित स्व.अनिकेत अजित पाटील व स्व.सागर सिताराम ताम्हाणे यांच्या स्मरणार्थ भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. कल्याण मुरबाड हायवे लागत असलेल्या सीमा रिसॉर्ट म्हसोबा मंदिर वरप या ठिकाणी क्रिकेट रसिकांसाठी स्व.रोहित भाई भोईर क्रिकेट संघाचे संघमालक कु.राज भोईर यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचे आयोजन व नियोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक १ लाख तर द्वितीय ५०,००० तृतीय २५,००० तृतीय पारितोषिक २५,००० पाचवे पारितोषिक २५,००० तसेच उत्कृष्ट मालिकावीर, फलंदाज, गोलंदाज क्षेत्ररक्षण, त्यांच्यासाठी देखील विशेष पारितोषिक देण्यात येणार आहे. दिनांक २७डिसेंबर२०२३ ते रविवार ३१ डिसेंबर२०२३ पर्यंत क्रिकेट रसिकांसाठी ही मोठी परवणी आहे. संपूर्ण स्पर्धा ही युट्युब वर लाईव्ह दाखवण्यात येणार असून या स्पर्धेचे सूत्रसंचालक रोशन संते करणार आहेत.तरी सर्व क्रिकेट प्रेमींनी व कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी स्व. रोहित भाई भोईर प्रतिष्ठानच्या वतीने सांगितले आहे.