२२ जानेवारीला घराघरात गोड दिवाळी साजरी व्हावी या भावनेतून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी उल्हासनगरकरांना साखर आणि डाळ वाटप.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
येत्या २२ जानेवारी रोजी देशाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात एक सुवर्ण अध्याय लिहिला जाईल. कोट्यवधी रामभक्त आणि हिंदू बांधवांचे श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असून प्रभू श्रीरामांचे आगमन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर दिवाळी साजरी करण्याची तयारी सुरू झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कल्याण लोकसभा चे लोकप्रिय खासदार डाँ श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते आज कल्याण लोकसभा अंतर्गत उल्हासनगर मतदारसंघात शिधावाटप कार्यक्रम खासदार डॉ श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांचा हस्ते सम्पन्न झाला.प्रभू श्रीरामांच्या आगमनप्रित्यर्थ प्रत्येकाच्या घरामध्ये गोडधोड झाले पाहिजे. यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या पुढाकाराने कल्याण लोकसभा मतदारसंघातील कुटुंबांना साखर आणि डाळ मोफत वाटप करण्यात आले. यावेळी उल्हासनगर मतदारसंघातील अनेक महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती.श्रीराम मंदिर लोकार्पणाचा दिवस दिवाळी दसरा म्हणून आपण सर्वांनी उत्साहात साजरा करावा,असे आवाहन यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी उल्हासनगर मतदारसंघातील उल्हासनगर शहराचे शहरप्रमुख श्री राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या प्रभागात सी ब्लॉक परिसरात हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी आमदार श्री बालाजी किणीकर,श्री कुमार आयलानी,उपजिल्हा प्रमुख श्री अरुण आशन,श्री राजेश कदम,श्री दिलीप गायकवाड,महानगर प्रमुख श्री राजेंद्र चौधरी,उल्हासनगर पूर्वचे शहरप्रमुख श्री रमेश चव्हाण तसेच स्थानिक पदाधिकारी विभागप्रमुख,शाखाप्रमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.