उल्हासनगर कॅम्प क्र. ४ मधील दहा चाळ भागातील महिला पाणीपुरवठा विभागावर आक्रमक आणि मोर्चा.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
मंगळवार दिनांक २६/०३/२०२४ दहा चाळ नागरिकांचा महिला मोर्चा १९ मार्च २०२४ रोजी सर्टीफाय ते कुर्ला कॅम्प रोड येथे Eagle Infrastructure ह्या कंपनी चा वतीने ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम सुरू होते त्या दरम्यान पोकळ चालक हा नशे मध्ये असून नशे मध्ये त्याच्याकडून सुभाष टेकडी विभाग कडे येणारी पाण्याचा आऊटलाईन मध्ये होल करण्यात आले व त्या होल पडलेल्या पाईप वर बल्डोजर नी रोड वरील खोदण्यात आलेले दगड माती टाकून ती लाईन बुजविण्यात आली तसेच पाणी सोडण्याचा वेळ झाला असून वॉलमेन ह्यांनी पाणी सोडले असता होल झालेल्या पाईप लाईन मधून पाणी भर वेगाने रस्त्यावर वाहू लागले तसेच होल झालेल्या पाईप मध्ये पाणी चा प्रेशर मुळे मोठ्या संख्याने दगड माती जाऊन सुभाष टेकडी विभागातील पाईप लाईन चोकअप झाले असून नशेडी चालक मुळे सुभाष टेकडी दहा चाळ, लुंबिनीवन हौसिंग सोसायटी,सिद्धार्थ हौसिंग सोसायटी,डिफेन्स कॉलनी येथील नागरिकांना गेल्या १ हफ्त्या पासून पाणी पासून वंचित रहावं लागल..
दिनांक १९ मार्च २०२४ पासून सुभाष टेकडी दहा चाळ, लुंबिनीवन हौसिंग सोसायटी,सिद्धार्थ हौसिंग सोसायटी,डिफेन्स कॉलनी येथील नागरिकांना पिण्यासाठी व वापरण्यासाठी पाणी नाही वृध्द महिला पुरुष हे लांबून टाकी वरून पाणी भरत असत परंतु वरील विभागात पाणी चा काही पत्ता नाही,अशातच संताप झालेल्या दहा चाळ आणि बाजूच्या परिसरातील महिलांनी आज महिला मोर्चा धडक काडून थेट नेताजी चौक उपअभियंता पाणी पुरवठा दक्षिण क्षेत्र उल्हासनगर ४ येथे सर्व महिला व स्थानिक नागरिकांनी जाऊन संबंधित इंजिनियर व इतर अधिकारी ह्यांची चांगलीच शाळा घेतली व सुभाष टेकडी येथील दहा चाळ विभागाला ठरावीक वेळ अनुसार पाणी भेटल पाहिजे ह्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा धीला असून पाणी पुरवठा विभाग इंजिनियर ह्यांनी मोर्चा काढलेल्या सर्व नागरिकांचे म्हणण आईकले व सर्व समस्या दूर करतील ह्याचे आश्वासन दिले असून जर पुन्हा पाणी आलं नाही किंवा वेळ निश्चित झाली नाही तर विभागातील महीलांन कडून पुन्हा मोठ्या आंदोलनाचा इशारा पाणी पुरवठा विभाग अधिकारी ह्यांना दिला आहे…तसेच पत्रकार बांधवांनी अती प्रमाणात सहकार्य करून आमचा सोबत पाण्यासाठी लढा दिला त्यांचे मनःपुर्वक आभार.