Breaking NewsheadlineHeadline TodaypoliticsUlhasnagarUlhasnagar Breaking News

कलानी कुटुंबाकडून मुस्लिम,दलित,वंचित,आंबेडकरी जनतेच्या मतांचा अपमान.

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 

दलित मुस्लिम वंचितांनी उल्हासनगर मध्ये नेहमीच पप्पू कलानी यांच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे असतांना ते गुन्हे सिद्ध झाले असतांना सुद्धा मतदान करुन त्यांना मदत केली आहे. पप्पू कलानीच काय तर त्यांच्यावर मुलगा ओमी कलानीला सुध्दा त्याच्यावर जबर गुन्हे नोंद असतांना मुस्लिम दलित वंचित जनतेने सांभाळून घेत उल्हासनगर शहराच्या महत्त्वाच्या पदांवर आमदार, महापोर,नगरसेवक निवडून दिले आहे. आज त्याच पप्पू कलानी आणि ओमी कलानी यांनी  भाजपा सोबत असणारे शिंदे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याशी कल्याण लोकसभेत दोस्ती का गठबंधन म्हणून युती करून उल्हासनगरातील मुस्लिम दलित वंचित जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

 या मुळे उल्हासनगर शहरातील दलित मुस्लिम वंचित समुहांत आपला विश्वासघात झाला म्हणून संतापाची लाट पाहण्यास मिळत आहे. यावेळी कलानी कुटुंबाला उल्हासनगर शहरात मुस्लिम दलित वंचित जनता मतदान करणार नाही यापुढे वंचित बहुजन आघाडी पक्षा सोबत मुस्लिम दलित वंचित समुह जाणार आहे व वंचित बहुजन आघाडीच्याच उमेदवारांना निवडून आणू अशी चर्चा उल्हासनगरातील दलित मुस्लिम वंचित जनते मधे होत आहे. यंदा उल्हासनगरातून वंचित बहुजन आघाडी कडून कल्याण लोकसभेचे उच्च शिक्षित उच्च पदवीधर उमेदवार डॉ.मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.







Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights