Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking NewspoliticsSocial

रेल्वे अपघातात दोन्हीही पाय गमावलेल्या कल्याण पूर्वेतील नवविवाहित युवकाला मोठा दिलासा.

 

कल्याण : नीतू विश्वकर्मा 

कल्याण – ४ महिन्यापूर्वीच विवाह झाल्यानंतर कल्याण पूर्वेत स्थायिक होवून आपल्या परिवाराचे उज्वल भविष्य घडविण्याचे स्वप्न पहाणारा जगन जंगले या ३२ वर्षीय युवकाला २२ मे रोजी रेल्वे अपघातात आपले दोन्हीही पाय गमवावे लागले आहेत . या अपघातात संपूर्ण आयुष्याची राखरांगोळी झालेल्या जगन जंगले या दुदैवी युवकाची शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी तातडीने रुग्णालयात जावून भेट घेतली व त्याची आस्तेने विचार पूस करीत  मदत म्हणूच त्याला एक लाख रुपयांची मदत केली तसेच महेश गायकवाड यांच्या मध्यस्तीमुळे सदर रुग्णालयाने आज पर्यंत उपचारावर झालेला तसेच पुढेही होणारा सर्व खर्च माफ केला असून या दुदैवी युवकाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निर्धीही तातडीने उपलब्ध करून दिला जाणार आहे . महेश गायकवाड यांच्या या मदतीमुळे जंगले कुटंबीयांवर कोसळलेल्या या संकटातून उभे रहाण्यास मदत मिळाली असल्याने जंगले कुटुंबियानी महेश गायकवाड यांचे आभार मानले आहेत.


या वर्षीच्या फेब्रवारी २०२४ मध्ये विवाह झालेला जगन जंगले हा बत्तीस वर्षीय युवक दादर येथील एका पुस्तक विक्रीच्या दुकानात महिना पंधरा हजार या नाममात्र पगारावर नोकरी करत होता . या निमित्ताने दादर ते कल्याण असा त्यांचा दररोजचा लोकल प्रवास होता . २२ मे रोजी दादरहून कल्याण साठी प्रवास करत असतांना आणि लोकल मध्ये गर्दी असल्याने त्यांना लोकलच्या दारातच उभे राहून प्रवास करीत असतांना त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याच्या उद्देशाने ठाणे ते कळवा दरम्याच त्यांच्या हातावर अज्ञात इसमाने लाकडी दांडीचा फटका मारला, या घटनेत मदने यांचा तोल जाऊन ते चालल्या लोकल मधून खाली पडले असता या अपघातात त्यांचे दोन्ही पाय लोकल खाली येऊन कापले गेले . मदने यांचा उपचारार्थ ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले मात्र त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले आहेत.

प्रतिकुल परिस्थितीतही आपल्या कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या मदन जंगले यांच्यावर कोसलेल्या या संकटाचे गांभीर्य लक्षात घेवून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी रुग्णालयात धाव घेवून या दुदैवी युवकाची भेट घेतली व  गुंजाई फाउंडेशनच्या माध्यमातून त्याला एक लाख रुपयांची तातडीची मदत केली असून महेश गायकवाड यांच्या  मध्यस्थिनेच रुग्णालयाने मदने यांच्यावर उपचारासाठी झालेला सर्व खर्च माफ केला आहे तसेच खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीही तातडीने उपलब्द करून देणार असल्याचे या वेळी महेश गायकवाड यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights