अंबरनाथचे आमदार बालाजी कीनिकर यांचा तर्फे शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिना निमित्त अंबरनाथ पश्चिम भागातील सौ. मंदाकिनी भोर प्राथमिक विद्यालयातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्याना वह्या व छत्री वाटप करण्यात आले.
अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिना निमित्त तसेच हिंदूहृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण व विचारांचा वारसा पुढे नेता सालाबादा प्रमाणे ह्याही वर्षी अंबरनाथ पश्चिम भागातील सौ. मंदाकिनी भोर प्राथमिक विद्यालयातील गोर गरीब गरजू विद्यार्थ्याना माझ्या वतीने वह्या व छत्री वाटप करण्यात आले.
याप्रसंगी मा. नगराध्यक्ष श्री सुनिल चौधरी, मा. नगरसेविका सौ. मंदाकिनी भोरताई, श्री. सुरेंद्र यादव,शिवसेनेचे श्री. आंब्रेश गवडा, श्री. बसवराज दयाल,विनोद वाल्मिकी, वेंकटश मुद्लीयर, महिला आघाडीच्या सौ. अनिता लोटे,श्री.युवासेना लोकसभा सचिव श्री.शैलेश भोईर, युवासेना शहर समन्वयक श्री. चंद्रकांत मोटे,शहर सचिव श्री.अजिंक्य पाटील,उपाध्यक्ष महेश वाल्मिकी, ख्वाजा युनूस चौधरी, चंद्रकांत गांगुर्डे, जावेद शेख, ओमकार भोसले, गणेश लाटे, नरेश गुलगिरी,तसेच कार्यकर्ते शिक्षक गण उपस्थित होते.