Ambernath breaking newsheadlineHeadline TodaypoliticsSocial

अजुन एक मुख्य नैसर्गिक प्रवाह बुजवण्याचे काम अनधिकृत रित्या अतिक्रमण करून गुरूकुल ग्रैंड युनियन शाळे तर्फे केले जात आहे.

 



अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा 

गोविंदतीर्थ पुल व अंबरनाथ पुर्व, कानसई विभागातील मोहन पुरमच्या मागील बाजूस असलेला अंबरनाथ शहराचा पावसाळी पाण्याच्या प्रवाहाचा निचरा करणारा सर्वात मोठा व मुख्य नाला अनाधिकृरीत्या बंद व अडथळा निर्माण करून मुख्य नाला बुजवण्याचे काम अनधिकृत रित्या अतिक्रमण करून गुरूकुल ग्रैंड युनियन शाळे तर्फे केले जात आहे.  या प्रकरणात यापूर्वी वऱ्याचशा स्थानिक लोकांनी, लोक प्रतीनिधींनी, रहीवासी सोसयटीनीं अंबरनाथ नगरपरीषदे सोवत पत्रव्यहार करून पालिका प्रशासनास ही बाब निदर्शनास आणुन दिलेली आहे परंतु याबाबतीत यावर्षी मोठ्या प्रमाणात अनधिकृत पणे अतिक्रमण होत असलेली मातीची भरणी व नाल्यामध्ये उभी केलेली सिंमेट कांकीटची मजवुत व भव्य मोठी भिंत ही गुरूकुल गॅण्ड युनियन शाळा द्वारे नाल्यामध्ये विस्तारीत अतिक्रमण केले असली तरी त्यांनी केलेले अनाधिकृत अतिक्रमण हे आजु बाजुच्या परीसराच्या तसेच संपुर्ण अंबरनाथ शहराच्या जीवीत व वित्त स्वरूपाच्या धोक्याचे आहे.

या अनधिकृत पणे अतिक्रमण केलेल्या भरणी मूळे यावर्षी अंबरनाथ शहाराचा पुर्व भाग हा पावसाळयात संपुर्ण पाण्याखाली व पुरग्रस्त परीस्थीतीखाली असणार आहे. या संपुर्ण परीस्थीतीस पुर्णपणे अंबरनाथ नगरपरीषद व अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे असणार आहेत. त्यामुळे हे अतिक्रमण त्वरीत हटविण्यात यावे. अशी मागणी होते आहे, याच नाल्यावर या ठिकाणाहुन ५० मीटर पुढे भरतनगरच्या बाजुने नाल्या लागुन असलेली वर्षानुवर्षे जुनी असलेली घरे निष्कासित करण्यात येऊन नाला रूंद करण्यात आलेला आहे. एका बाजुला पुरग्रस्त परीस्थीतीचे कारण देत रहीवासी घरे तोडण्याचे काम प्रशासन करते आणि दुस-या बाजुस पुर्ण नाला बुंजविण्याचे काम अनधिकृत रित्या शाळा प्रशासन करते आहे.

सदर विषयात आगरी सेना ठाणे जिल्हा सरचिटणीस मंगेश शेलार व मोहन पुरम हौसिंग सोसायटी सोबत निलेश मेकल, अर्चना मेकल, जितेंद्र बावनी, लक्ष्मण शिंदे, राजेंद्र मोरे, मनमोहन पनीकर, सुरेश चव्हाण यानी वारंवार पत्रव्यवहार केला आहे व आता उपोषणा चा अंतिम ईशारा दिला आहे.







Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights