कल्याण पूर्वेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने स्मार्ट मीटर विरोधात महावितरणच्या कार्यकारी अभियंताला निवेदन.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
कल्याण पुर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दि.१४-०६-२०२४ रोजी मा.महापौर तथा कल्याण लोकसभा सहसंपर्कप्रमुख श्री रमेश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासन महावितरण कंपनीच्या माध्यमातून स्मार्ट मीटर लावुन गोरगरीब जनतेला देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या सरकारला आंदोलनाचा इशारा देण्यात आला. ठराविक एका उद्योगपतीच्या फायद्या साठी असं जर शिंदे सरकार वागणार असेल तर गोरगरीब जनतेसाठी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करु असं यावेळी श्री रमेश जाधव साहेब यांनी सांगितले.* *महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ तेजश्री कार्यालय कल्याण पश्चिम येथे शिवसेना शिष्टमंडळाने महावितरण चे कार्यकारी अभियंता श्री काळे साहेब यांना निवेदन दिले*
यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक श्री हर्षवर्धन पालांडे, शिवसेना कल्याण शहर प्रमुख श्री शरद पाटील युवासेना शहर अधिकारी ॲड.कुमार निरज, उपविभाग प्रमुख श्री जगदीश जाधव, शाखाप्रमुख श्री प्रमोद परब, युवासेना उपशहर अधिकारी श्री दत्तात्रय पाखरे उपस्थित होते.