कल्याण पूर्व असो की पश्चिम कोणत्याही परिस्थितीत विधानसभेला उभं राहणार – काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे
कल्याण : नीतू विश्वकर्मा
2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील चुकांमधून आपण भरपूर काही शिकलो आहोत. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या 2024 च्या निवडणुकीचे राजकीय गणित तयार असून कल्याण पूर्व असो की पश्चिम कोणत्याही परिस्थितीत आपण या निवडणुकीमध्ये उभे राहणार असल्याची घोषणा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली आहे.
कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांची प्रमूख संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात सचिन पोटे यांनी आपली राजकीय कारकीर्द, लोकसभा निवडणुकीतील अनुभव, दबावाचे राजकारण, दहा वर्षांत पक्ष सोडून गेलेले नेते, कल्याण डोंबिवलीतील नागरी समस्या, कल्याण जिल्हा काँग्रेसची सद्यस्थिती अशा विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली.
महाराष्ट्रात महविकास आघाडीचेच सरकार पुन्हा येणार…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यातून गेली, त्या सर्वठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले आहेत. महाराष्ट्रामध्ये आम्ही नंबर एकचा पक्ष असून 100 ते 140 विधानसभा मतदारसंघात आम्हाला चांगला लीड आहे. मात्र स्वबळावर लढण्याबाबत कुठेही चर्चा झाली नसून तिन्ही पक्षांना एकत्रित लढण्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा महविकास आघाडीचेच सरकार येणार असा ठाम विश्वास काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी यावेळी व्यक्त केला.
काँग्रेस पक्षाने आपल्याला इतके दिले मग का सोडू?…
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून काँग्रेस पक्ष नंबर एक बनला आहे. त्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर वाढली असून कल्याण पूर्व असो की कल्याण पश्चिम आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असा ठाम विश्वास सचिन पोटे यांनी यावेळी व्यक्त केला.
कल्याण पूर्व असो की पश्चिम कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच…
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवून काँग्रेस पक्ष नंबर एक बनला आहे. त्यामुळे आमची बार्गेनिंग पॉवर वाढली असून कल्याण पूर्व असो की कल्याण पश्चिम आपण कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असा ठाम विश्वास सचिन पोटे यांनी यावेळी व्यक्त केला.