कोकण पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मा. रमेश किर साहेब यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीच्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.
काँग्रेस पक्षाचे व महाविकास आघाडीचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार श्री. रमेश कीर यांच्या प्रचारार्थ सर्व घटक पक्षांच्या सर्व प्रमुख व सक्रिय पदाधिकारी यांची महत्वपुर्ण बैठक दिनांक १५ जून रोजी टाऊन हॉल येथे पार पडली. उल्हासनगर प्रभारी माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे नेते व पदाधिकारी हजर होते.
यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवाचा वचपा काढायची संधी आली आहे, असे आपल्या भाषणात सांगितले. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी लोकसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य केले तसेच कार्य करण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेशजी किर यांचे सामाजिक व राजकीय कार्य उपस्थितांना सांगितले. रमेश किर यांना बहुमत मिळवून देण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन प्रयत्न करू असे सांगत उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले. महाविकास आघाडीचे उमेदवार रमेशजी किर यांनी सध्याचे आमदार निरंजन डावखरे यांच्यावर निशाणा साधत निरंजन डावखरे हे निष्क्रिय लोकप्रतिनिधी असून त्यांनी कोकणाच्या पदवीधरांसाठी काहीच केले नाही अशी टीका केली. तसेच सुशिक्षित मतदारांना यावेळेस बदल घडवण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले.
बैठकीनंतर उमेदवार रमेशजी कीर व काँग्रेस शिष्टमंडळ यांनी कलानी महल येथे पप्पू कलानी व ओमी कलानी यांची भेट घेऊन पाठिंबा देण्यासाठी सकारात्मक चर्चा केली. १६ जून रोजी नेहरू भवन येथील काँग्रेस भवन येथे टीम ओमी कलानी व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारास पाठिंबा जाहीर केला.
सदर बैठकीला काँग्रेस माजी जिल्हाध्यक्ष राधाचरण करोतिया, माजी गटनेत्या अंजली साळवे, महिला जिल्हाध्यक्ष मनीषा महाकाळे, प्रदेश प्रतिनिधी वजुरुद्दिन खान, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, नाणिक अहुजा, शंकर अहुजा, माजी महापौर मालती करोतिया, दीपक सोनावणे, महादेव शेलार, कुलदीप ऐलसिंघानी, शिवसेना नेता राजेश वानखेडे, राजेंद्र शाहू, दिलीप मालवणकर, दिलीप मिश्रा, डॉ जानू मानकर, राष्ट्रवादीचे गौरव भालेराव, नरेश गायकवाड, दीपक सोनोने व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्तिथ होते.