कोकण पदवीधर मतदार संघातील मविआ चे उमेदवार रमेश किर यांची प्रचार सभा तथा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आणी अंबरनाथ शहर काँग्रेस नवीन कार्यकारिणी ची घोषणा शनिवारी येथील कृष्णा पाटील हॉल मध्ये झाली.
अंबरनाथ- कोकण पदवीधर मतदार संघातील मविआ चे उमेदवार रमेश किर यांची प्रचार सभा तथा काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आणी अंबरनाथ शहर काँग्रेस नवीन कार्यकारिणी ची घोषणा शनिवारी येथील कृष्णा पाटील हॉल मध्ये झाली.
अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष ऍड कृष्णा रसाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सदर कार्यक्रमात ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष दयानंद चोरघे,जिल्हा प्रभारी राजेश शर्मा, काँग्रेस चे नेते ऍड यशवंत जोशी,तथा राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे शहराध्यक्ष सदाशिव पाटील, सोमनाथ मिरकुटे, जयराम मेहरे,विश्वनाथ जाधव, कबीर गायकवाड, रोहित साळवी,कालिदास देशमुख, तथा अंबरनाथ, भिवंडी, शहापूर,मुरबाड,मधील मविआचे, जिल्हा व तालुकाचे पदाधिकारी सह घटकपक्षा चे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कोकण पदवीधर मतदार संघाचे मविआ उमेदवार रमेश कीर यांनी आपल्या भाषणात पदवीधरां चे प्रश्न सोडविणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे,पदवीधरांना एमपीएससी, युपीएससी परीक्षा चा फायदा देणे, तसेच त्यांना जिल्हा रोजगार योजने अंतर्गत नोकऱ्या देणे, व कोंकण विभागात नैसर्गिक दृष्ट्या विकास करून पर्यटन, व अन्य उघोग द्वारे रोजगार उपलब्ध करून देणे शिक्षका च्या प्रलंबित मागण्या मंजूर करणे व अन्य विषयावर रमेश कीर यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष ऍड कृष्णा रसाळ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आगामी 26 जून रोजी होणाऱ्या पदवीधर निवडणुकीत अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस सर्वतोपरी रमेश कीर यांना सहकार्य करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आश्वासन दिले,तसेच अंबरनाथ शहरातील पूर्व व पश्चिम भागातील सुशिक्षित व सर्व थरातून आणी समाजामधून काँग्रेस पक्ष बांधणी तथा मजबूत करणे करीता 12 उपाध्यक्ष,2 सरचिटणीस,5 चिटणीस खजिनदार,उप खजिनदार,शहर संघटक,7 सदस्य तथा कायदेशीर सल्लागार अशी नवीन कार्यकारिणी जाहीर केली.
यावेळी सर्व नवीन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला,नवीन कार्यकारिणी मध्ये ऍड अनिल काळे, मिलिंद पाटील विलास जोशी,सीझर लॉरेन्स, चेतन लोंढे,शत्रुघ्न उमाप, शुभदा काळे,के.गोपाळराय,नंदकुमार देवडे,प्रमोद पांडे,गनी पिरजादे,मनोहर जाधव संघजा मेश्राम आदींचा समावेश आहे.
उपस्थितांचे स्वागत माजी नगरसेविका करुणा कृष्णा रसाळ पाटील व अन्य महिलांनी केले तर सूत्रसंचालन रोहित प्रजापती तथा मनोहर जाधव यांनी केले.