संत सेनाजी केश शिल्पी महामंडळ करिता निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केल्याबद्दल राष्ट्रीय नाभीक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अरुण जाधव व पदाधिकाऱ्यांनी आमदार बालाजी कीनीकर की भेट घेत आभार मानले.
अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा
नाभीक समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता या संघटनेच्या माध्यमातून मी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करीत असून नाभीक समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी याकरिता मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प मांडताना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नाभीक समाजाच्या उन्नतीसाठी संत सेनाजी केश शिल्पी महामंडळ करिता निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केल्याबद्दल राष्ट्रीय नाभीक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. अरुण जाधव व पदाधिकाऱ्यांनी माझी भेट घेत आभार मानले. तसेच याचप्रमाणे इतर समस्याही सोडविण्याची मागणी केली असता या समस्याही प्राधान्याने सोडविण्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले.
याप्रसंगी संघटनेचे सचिव श्री. महेंद्र जाधव, ठाणे जिल्हाध्यक्ष श्री. भारत राऊत, कल्याणचे श्री. प्रकाश पवार, अंबरनाथ शहर अध्यक्ष श्री. लहू शिंदे, श्री. भीकाजी सकपाल, श्री. भालचंद्र मोरे तसेच इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.