नागरिकांच्या मागणीनुसार पॅनल १३ मधील रस्त्यांवरील खड्ड्यांवर डांबरीकरण करण्यात आले.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांच्या सततच्या तक्रारीनुसार उल्हासनगर महापालिकेकडे मनसेचे अँड. प्रदिप गोडसेयांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर बुधवार दि.05.06.2024 रोजी रात्रीच्या वेळेस स्टेशन रोड शर्मा डॉक्टर समोरील रस्त्यांवरील खड्ड्यांवर पॅच, सार्वजनीक समोरील रस्त्यावरील खड्ड्यांवर पॅच, आणि राहुल नगर येथील ससाणे रेशन दुकान जवळील रस्त्यावर डांबरीकरणच्या सहाय्याने पॅच मारण्यात आले व सदर रास्ता व्यवस्थित करण्यात आला.
त्यासंबंधीत अँड. प्रदिप गोडसे यांनी मानले उल्हासनगर महानगरपालिकेचे आभार..!