Ambernath breaking newsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking NewsUlhasnagarUlhasnagar Breaking News

पावसाचे पाणी साचणाऱ्या ठिकाणी पंपांची व्यवस्था करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश.

ठाणे – नीतू विश्वकर्मा 

पावसाळ्याच्या कालावधीत कोणतीही आपत्ती उद्भवू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने पाणी साचणे, नाले तुंबणे आदी ठिकाणे शोधून तेथे उपाययोजना कराव्यात, अशा सूचना उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिले. 

पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक दूरदृश्यप्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार संजय भोसले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. अनिता जवंजाळ सहभागी झाले होते. तसेच ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे, जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच मीरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण डोंबिवली या महापालिकांचे आयुक्त, अंबरनाथ व बदलापूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्त, रेल्वे, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, एसटी महामंडळ, पशुसंवर्धन, कृषी, जलसंपदा आदी विभागाचे अधिकारी यावेळी ऑनलाईन उपस्थित होते. 

साथरोगावरील औषधांचा पुरेसा साठा ठेवा

जिल्ह्यातील मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेऊन श्री. देसाई म्हणाले की, पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात नाले तुंबणे, पाणी साचणे असे प्रकार होतात. अशा ठिकाणी महानगरपालिका, नगर पालिका यांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपांची व्यवस्था करावी. महापालिका, नगरपरिषदांनी आतापर्यंत नालेसफाई पूर्ण केली आहे. परंतु काही वेळेस एकदम येणाऱ्या पावसामुळे अनेकवेळेस गटारीमध्ये घाण साचून नाले तुंबतात. या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होवून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. नाल्यांच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष ठेवावे. 

धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याचे काम पडल्यास. ही तात्पुरती निवारा केंद्र सुविधांनी सज्ज असावी. या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीजेची सुविधा असावी,  अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.  

मंत्री श्री. देसाई म्हणाले, नागरी व ग्रामीण भागातील रूग्णालयांमध्ये औषधसाठा पुरेसा उपलब्ध करून ठेवावा. साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क असावे. साथरोगावरील औषधांची उपलब्धता निश्चित करावी. गृह विभागाने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘ईमरजन्सी हेल्पलाईन क्रमांका’ची सुविधा सुरू करावी. पूर किंवा पावसाशी निगडीत घटनेशी कॉल आल्यास, तात्काळ संबंधित यंत्रणेला माहिती देवून गरजू नागरिकांना मदत द्यावी. 


जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज – जिल्हाधिकारी

यावेळी जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनी मान्सूनपूर्व तयारीची माहिती दिली. आपत्त्कालीन परिस्थितीत मदत पोचविण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत संबंधित गावांना पुरेशा प्रमाणात साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. नालेसफाई, घनकचरा, पाणी पुरवठा, साथरोग आदीसंदर्भात संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शोध व बचाव कार्यासाठी तहसीलनिहाय पथक तयार करण्यात आले असून त्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

जिल्हास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात आले असून तेथे हॉटलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आपत्ती निवारण आराखड्याचे काम प्रगतीपथावर असून लवकरच तो पूर्णत्वास आणण्यात येणार आहे. जिल्ह्यात दहा ठिकाणी बहुद्देशीय निवारा केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. दरडप्रवण क्षेत्रातील कामांना मंजुरी देण्यात आली आहे. तसेच 152 पूरप्रवण गावांमध्ये उपाय योजना करण्याचे निर्देश संबंधित प्रशासनास देण्यात आले आहेत. धोकादायक पूल, खड्डेमय रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधित विभागाना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी श्री. शिनगारे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights