महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी केला विद्यार्थ्यांचा सत्कार.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर शहर अध्यक्ष संजय दादा घुगे यांनी नुकतेच १० वी आणि १२वी परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या शिक्षणासाठी काही अडचण आली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पाठीशी आहे आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू.खुप शिका आणि आपल्या आई वडीलाचे नाव मोठे करा. आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष निलेश अनिल धिवरे,शाखा अध्यक्ष सूरज संतोष जाधव,उप शाखा अध्यक्ष रोहित बागुल महाहाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.