headlineHeadline TodaypoliticsUlhasnagarUlhasnagar Breaking News

शेवटच्या श्वासापर्यंत निष्ठावंत राहिला हा बाळासाहेबांचा मावळा.

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 

रवींद्र सिंग भुल्लर उर्फ पिंकी भाई आज यांचे अकस्मित निधन झाले. पिंकी भाई या नावाने प्रचलित असून रिक्षा युनियन चे अध्यक्ष देखील होते. शहाड स्टेशन परिसरात त्यांचा असणारा धबधबा कायम पाहायला मिळत असे रिक्षा चालकांचे प्रश्न असो अथवा त्यांच्या सामाजिक प्रश्न असो पोलिस ठाण्यात धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. पिंकी भाईच्या कार्यालयात कधी ना खुर्ची रिकामी न राहता अनेक जुने जाणते शिवसैनिक व रिक्षाचालक त्यांच्या कार्यालयात बसत.उद्धव ठाकरे यांच्या संकटकालीन दोन हात करून पक्षाशी एकनिष्ठ राहिले.पक्षाने देखील त्यांचे पक्षावरील असणारे प्रेम व निष्ठेचे फळ म्हणून त्यांना शहराध्यक्ष पदावर विराजमान केले.त्यांच्या जाण्याने उल्हासनगर शहरातील शिवसैनिक रिक्षाचालक हळहळ व्यक्त करत आहे.आज जरी त्यांची प्राण ज्योत मावळली असली तरी त्यांचे कार्य  प्रकाशमय असेल.आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सामील आहोत. पिंकी भाई तुम्ही सदैव आठवणीत राहतील.

 

तुमचा सहकारी श्री.निकेत सखाराम व्यवहारे युवासेना शहराधिकारी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हारळ शहर शाखा.







Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights