उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग बांधवांसाठी जुलै महिन्यापासून २२०० रुपये पेन्शन आणि महानगरपालिकेची बस सुविधा मोफत व रोजगार स्टॉल उपलब्ध…
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
आज दिनांक 2 जुलै, 2024 रोजी उल्हासनगर महानगरपालिका येथे उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त साहेब श्री. अजित शेख, अतिरिक्त आयुक्त साहेब श्री. जमीर लेंगरेकर, दिव्यांग कल्याणकारी विभाग उपायुक्त साहेब श्री. डॉ. सुभाष जाधव, दिव्यांग विभाग प्रमुख श्री. राजेश घणघाव यांच्या समवेत महानगरपालिकेमध्ये उल्हासनगर क्षेत्रातील कार्यरत असलेल्या संघटना व दिव्यांगान बाबत काम करत असलेले सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक आयोजित केली होती, माननीय आयुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त साहेब व उपायुक्त साहेब काही मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली व सदरील मुद्दे मंजूर करण्यात आले 1) किमान 2200/- रुपये जुलै-24 नुसार वाटप करण्यात येईल तसेच एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने 1500/- रू. प्रमाणे वाटप केले जाणार आहे. 2) महानगरपालिकेच्यावतीने सुरू असलेल्या परिवहन बस सेवेमध्ये दिव्यांगांना पूर्णतः मोफत प्रवास येणार आहे. 3) सातत्याने मागणी करण्यात आलेल्या ही योजना होती ती दिव्यांगांना स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 4) महापालिकेच्या वतीने दिव्यांग अमन्वय समिती स्थापन करण्यात येणार आहे यामध्ये महापालिका क्षेत्रातील दिव्यांगाबतचे कार्यरत संस्था संघटना अशा प्रत्येक संघटनेमधील एका प्रतिनिधी यामध्ये सामावून घेणार आहोत यापुढे कोणत्याही प्रकारचे योजना सुरू करण्या अगोदर या समितीचे बैठक करून सदरील योजना राबविण्यात येईल. अशाप्रकारे चर्चा करून सर्व संघटनांनी आपापल्या परीने विविध योजनांचा पाठपुरावा केला आयुक्त साहेबांनी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
दिव्यांग आधार सेवा संस्थेचा अध्यक्ष सचिन राम सावंत,विकास महासंघ चे अध्यक्ष राजेश साल्वे,प्रहार जशक्ति पार्टी चे वकील स्वप्निल पाटिल,दिव्यांग संघर्ष समिति चे अध्यक्ष नरेश गायकवाड, निरधार विकास विकलांग सामाजिक संस्था चे अध्यक्ष रेहाना कुरेशी और टीकम उदासी ने महापालिकेच्या सर्व अधिकारी यांचे आभार व्यक्त केला आणि उपस्थित सर्व संघटना यांचे देखील आभार व्यक्त केला की ज्यांनी दिव्यांगांच्या विकासासाठी आज महापालिकेत उपस्थित राहून मुद्दे मांडून आणि सातत्याने आपण मागणी करत असलेल्या पेन्शन वाढी संदर्भात जी आज 2 जुलै, 2024 नुसार दर महिना 2200/- रू. करण्यात आली याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केला.