करोडो रुपये खर्चून महापालिके कडून होतायेत निकृष्ट दर्जाची कामे.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महापालिकेच्या वतीने उल्हासनगर शहरात सुरु असलेल्या विकास कामांमध्ये मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याने शहरातील विकास कामे ही अंत्यन्त निकृष्ट दर्जाची होत आहेत.व या कामांवर महापालिकेच्या अधिकाऱ्यांच कोणतंही नियंत्रण नसून ही महापालिका ठेकेदार चालवतात की प्रशासन असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील नागरिकांनी या निकृष्ट कामाबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की हे अधिकारी एकमेकांकडे बोट करून आपल्या जबादारी झटकतात.ही बाब गंभीर असून.हे निकृष्ट दर्जाचे काम अधिकारी ठेकेदार यांच्या संघनमतानेच होत असल्याची चर्चा सध्या शहरात सुरु आहे.उल्हासनगर – ३ मधील काँग्रेस ऑफिस ते पप्पू सोसायटी पर्यंतच्या कामांबाबत तसेच उल्हासनगर – ५ मधील सहयाद्री नगर चॉकलेट कंपनी येथे सुरु होते व या बाबत स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊन सुद्धा मनपा अधिकाऱ्यांनी हे काम बंद केले नाही.व ठेकेदाराने दोन दिवस सुट्टीचा फायदा घेऊन भर पावसात घाईघाईने हे काम पुर्ण केले.या निकृष्ट दर्जाच्या कामाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.व या निकृष्ट दर्जाच्या कामाला जे कोणी अधिकारी दोषी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून या कामाचं बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी मनसेचे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्याकडे केली आहे.जर या कामाला जबादार असणाऱ्यांवर ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करण्यात आली नाही तर मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच या पुढच आंदोलन हे मनसे पद्धतीने आयुक्तांच्या दालनात असेल असा ईशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सचिन कदम जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख,जिल्हा संघटक दिलीप थोरात,शहर अध्यक्ष संजय घुगे, शहर अध्यक्ष सचिन बेंडके,शैलेश पांडव,यावेळी मैनुऊद्दीन शेख,सुहास बनसोडे,नटवर वासिटा,कैलास घोरपडे, कैलास वाघ,हितेश मेहरा, दीपेश धरिवाल,मनिष मोरे,लड्डन रेन, राहुल राणे, दिपक भोई,संजय नार्वेकर,संतोष खत्रे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.