उल्हास नदीत सतत एक महिन्यापासुन जलपर्णी दर्शन.
कल्याण ग्रामीण: नीतू विश्वकर्मा
ठाणे जिल्ह्यातील ५० लाखांपेक्षा जास्त नागरिकांना पाणी पुरवठा करणारी उल्हास नदी ही मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होऊ लागली आहे. कारखान्यांतून सोडले जाणारे रसायनमिश्रीत सांडपाणी मुळे नदीत वेगाने वाढत असलेली जलपर्णी दिसत आहे, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण तसेच ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण परिसरातील गावांचे सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे उल्हास नदीचे अनेक ठिकाणी नाल्यात रूपांतर झाले आहे. काही वर्षांपासून नदीपात्रात जलपर्णी फोफावत आहे. गेल्या वर्षी केलेल्या उपाययोजना मुळे बऱ्याच प्रमाणात ह्यावर्षी कमी झालेली दिसून येत होती, परंतु ह्यावर्षी एक महिन्यापासुन सतत आपटी, रायता, काम्बा, म्हारल, सिमा रिसोर्ट, रीजेंसी एंटीलिया ते मोहना एनआरसी बंधारे पर्यंत ही अवाढव्य जलपर्णी पसरत आली आहे,मोहना बंधारा पाणी उपसा केंद्र येथे मोठ्या प्रमाणात अडकत आहे,नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या औद्योगिक तसेच निवासी भागातील सांडपाण्यावर पुरेश्या प्रमाणात आजही प्रक्रिया होत नाही. त्यामुळे नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे.